loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार दीपक केसरकर यांच्या कौटुंबिक सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

सावंतवाडी (प्रतिनिधी) - माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचे नातू चि. अर्जुन यांचा मौजीबंधन (मुंज) सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावून अर्जुन यास शुभाशीर्वाद दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही या कौटुंबिक सोहळ्यास उपस्थित लाभली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मंगल प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून केसरकर कुटुंबाच्या आनंदात सहभाग घेतला. तसेच, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री नितेश राणे, मंत्री आशिष शेलार यांसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी सोहळ्याला हजेरी लावली. उपस्थित सर्वच मान्यवरांनी चि. अर्जुन याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे सहर्ष स्वागत केले. या सोहळ्याला राजकीय नेत्यांसोबतच विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg