लांजा (वार्ताहर) - राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथून लांजाच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाची महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक बसल्याने रिक्षामधील महिला प्रवाशांसह रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. हि घटना मुंबई - गोवा महामार्गावरील वाकेड घाटीत घडली. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेला रिक्षाचालक अविनाश चंद्रकांत शिंदे (२८ वर्षे, रा. कणगवली शिंदेवाडी, ता. लांजा) याला उपचारासाठी प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. तर जखमी महिला प्रवाशांपैकी एका महिलेवर रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू असून उर्वरित किरकोळ जखमी महिलांना लांजा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले.
या अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक अविनाश शिंदे हा आपल्या ताब्यातील रिक्षाने (क्र. एमएच ०८ बीसी - ३२५६) भाडे घेवून राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथे गेला होता. त्याच्या रिक्षात तीन महिला प्रवाशी होत्या. वडदहसोळला जाताना तो साटवली मार्गे गेला होता. मात्र लांजाला परत येताना तो ओणी मार्गे येत होता. मुंबई - गोवा महामार्गावरील वाकेड घाटीत त्याची रिक्षा आली असता अविनाश शिंदे याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याची रिक्षा महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला (क्र. एमएच ४६ सीयु ०५७८) मागून जोरदार धडक दिली. रिक्षाची धडक एवढी जोरदार होती की, रिक्षाच्या पुढील भाग पुर्णतः चेपला गेला. यावेळी कंटेनरच्या मागील बाजूचा रॉड रिक्षाचालक अविनाश शिंदे याच्या डोक्याला लागल्याने त्याच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. तर रिक्षातील महिला प्रवाशांना मार बसल्याने त्याही या अपघातात किरकोळ जखमी झाल्या आहेत.
या अपघाताची माहिती मिळतात लांजा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना प्रथम उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र रिक्षाचालक अविनाश शिंदे व एका महिलेची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिक्षाचालक अविनाश शिंदे याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.









































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.