loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळणेश्वर येथील श्री देव रामेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील स्वंयभू श्री देव वेळणेश्वराच्या पावनभूमितील श्री देव रामेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा स्वयंभू श्री देव वेळणेश्वरांच्या व श्री ग्रामदेवतांच्या कृपाशिर्वादाने, तसेच वेळणेश्वर ग्रामस्थ व भाविकांच्या देणगीदारांच्या सहकार्याने गेल्या अनेक वर्षाचे श्री देव रामेश्वर मंदिराचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला असून श्री देव रामेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार श्रींची मुर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा शनिवार दि. ९ मे २०२६ ते बुधवार दि. १३ मे २०२६ या कालावधीत संपन्न होत आहे. शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी सायं. ४ वा. - नविन मुर्ती व कलश मिरवणूक श्री देव वेळणेश्वर मंदिर ते कालभैरव देवाची सहाण त्यानंतर देवतांचे मानपान देणे. सोमवार दि. ११ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून प्रायः श्चित्त विधी, देवता प्रार्थना संकल्प, गणपती पूजन, स्वतीपुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, संभारदान, स्थलशुद्धी, गंगापूजन, गणेशयाग, शांतीहोम, अयुतहोम, मंडपप्रतिष्ठा, शांती पाठ, महाप्रसाद रात्रौ स्थानिक भजने.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून प्राकारशुद्धी, देवतां स्नानविधी, जलाधिवास, धान्याधिकास, पुष्पाधिवास, शंखधिवास, तत्वन्यास, योगिनी आवाहन पूजा, वास्तुमंडल आवाहन पूजा, भैरव आवाहन पूजा, अग्नीस्थापना ग्रहमंडल आवाहन पूजा, वास्तुयाग, ग्रहयाग, पर्याय होम, तत्वहोम, संस्कार होम, ब्रह्मादिमंडल होम, शांतीपाठ, कलशारोहण श्री देव वेळणेश्वर व श्री देव कालभैरव देवस्थान संस्थान अध्यक्ष नानासाहेब पोळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात येईल .महाप्रसाद रात्रौ स्थानिक भजने,बुधवार दि. १३ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून मुख्य कार्यक्रम देवता प्राणप्रतिष्ठा, स्थलशुद्धी, देवता मधुपर्क पूजा, देवता प्रतिष्ठा मुहुर्त ८.०६ मि. तत्वन्यास, प्राणप्रतिष्ठा, महापूजा, प्रतिष्ठांग होम, बलीदान, यज्ञाची पुर्णाहूती श्रेयोग्रहण, विभूतीवंदन, महानैवेद्य, महाआरती, गाऱ्हाणे, आशिर्वाद, तिर्थप्रसाद, महाप्रसाद सोमवार दि. ११ मे २०२६ व मंगळवार १२ मे २०२६ रोजी रात्रौ स्थानिक भजने,बुधवार दि. १३ मे रोजी दुपारी ३ नंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ प्रमुख उपस्थिती पुरुषोत्तम नारायण गाडगीळ अँन्ड सन्स,रात्रौ ठिक १०.३० वा. श्री गणेश मित्र मंडळ (मुंबई) वाडदई गणेशवाडी, ता. गुहागर निर्मित कोकणचे नमन पारंपारिक गण, श्रृंगारिक स्त्री पात्रांनी नटलेली गौळण व धमाल विनोदी वगनाट्य तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री देव वेळणेश्वर व श्री देव कालभैरव देवस्थान संस्थानचे अध्यक्ष नारायण पांडुरंग पोळेकर यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg