रत्नागिरी - बसणी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित जी एम् शेट्ये हायस्कूलचा मार्च २०२६ मध्ये झालेल्या एसएससी (दहावी) बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने उत्कृष्ट यश संपादित करत 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेत सार्थक सुरेश बाचरे याने ९१.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. वेदांत आशिष गवाणकर याने ८८.८० टक्के गुणांसह द्वितीय, तर मंथन संजय घुमे याने ८२.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच मानस सचिन नागवेकर (८२.००%), तीर्था राजेंद्र पानकर (७९.६०%), निशांत मुकेश नेवरेकर (७९.४०%), श्रेयश्री संतोष लोंढे (७८.८०%), आर्यन महेश पाष्टे (७३.४०%), शर्विन विक्रम कदम (६८.४०%), आर्यन विलास चौघुले (६५.६०%), समृद्धी योगेश कदम (६२.६०%), श्रुतिका राकेश मोहिते (५९.००%), भूमी राजेंद्र पानकर (५८.००%) आणि सार्थक राकेश चंदरकर (४९.८०%) यांनीही यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.









































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.