loader
Breaking News
Breaking News
Foto

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचा १० वीचा निकाल १००%

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आबलोली या स्कूलचा इयत्ता १० वीचा निकाल १००% लागला आहे. इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण ७ विद्यार्थी बसले होते. हे ७ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. कुमारी शर्वरी श्याम पवार हिने ८२.८० गुण मिळवून स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कुमार कार्तिक सुनील मोहित याने ६९.४०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर कुमारी फरीना वसीम कुरेशी हिने ६५.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे आणि त्यांच्या पालकांचे चंद्रकला फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष सचिन बाईत, सेक्रेटरी सौ. स्नेहल बाईत, स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg