loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू इंग्लिश स्कूल कोरेगावचा १० वीचा निकाल १०० टक्के

खेड - साई सावली शिक्षण संस्था खेड (रत्नागिरी) संचलित न्यू इंग्लिश स्कूल कोरेगाव ता. खेड या माध्यमिक शाळेचा - एस. एस. सी. परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. प्रशालेत कुमारी निधी नरेश दळवी 382 गुण 76.40 टक्के मिळवून प्रथम, विभागून कुमारी पिंपळकर वेदिका महेंद्र 382 गुण 76.40 टक्के मिळवून प्रथम, कुमारी साळुंखे वैभवी किसन 380 गुण 76.00 टक्के मिळवून व्दितीय कुमारी मोरे कावेरी किशोर 365 गुण 73.00 टक्के मिळवून तृतीय आले आहेत. परीक्षेस एकूण 21 विद्यार्थी प्रविष्ठ झाले त्यापैकी विशेष श्रेणी प्रविण्य 3 प्रथम श्रेणी – 7 व्दितीय श्रेणीत - 11 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साई सावली शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, अध्यक्षा सौ.ज्योती कदम, उपाध्यक्ष सिद्धेशदादा कदम, उपाध्यक्ष अरुण उर्फ अण्णा कदम, सचिव तथा महारष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री योगेशदादा कदम, खजिनदार सौ.योगिता कापडी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेजर काशिराम सकपाळ, शैलेश कदम व संचालक मंडळाचे पदाधिकारी, स्थानिक स्कूल कमेटीचे चेअरमन अरविंद मोरे, सुधीर चव्हाण, रविंद्र मोरे, भिकू जाधव व सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक दिगंबर शिरसाट, शिक्षक विकास कोदारे, संजय पाटील, संजय चांदिवडे, सौ.निशा पास्टे व शिक्षकेतर कर्मचारी मनोहर दयालकर, सुभाष मोरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg