loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू इंग्लिश स्कूल लांजाचा दहावी परीक्षेचा निकाल ९६.१९ टक्के

लांजा (संजय साळवी) - लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल लांजा या माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल ९६ .१९ टक्के लागला असून कु. अथर्वा दिलीप खेगडे हिने ९७ . ८० टक्के गुणांसह प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा संचलित न्यू इंग्लिश स्कूल लांजा या माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून प्रशालाने ९६ . १९ टक्के गुणांसह आपला नावलौकिक कायम राखला आहे. दहावी परीक्षेत कु. अथर्वा दिलीप खेगडे हिने ९७ . ८० टक्के गुणांसह प्रथम, कु. आर्या अमित फणसळकर हिने ९७.४० टक्के गुणांसह द्वितीय तर कु. सचिन मनोज साह याने ९५ . २० टक्के गुणांसह प्रशालेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. या दहावी परीक्षेसाठी प्रशालेतून २८९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेचा एकूण निकाल ९६ . १९ टक्के लागला आहे. इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६६ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता धारण केलेली आहे. तर ९२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व ९२ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg