रत्नागिरी (जमीर खलफे) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सैतवडे येथील 'न्यू ईरा एज्युकेशन सोसायटी' संचलित न्यू ईरा इंग्लिश स्कूलने आपल्या नावाचा डंका पुन्हा एकदा वाजवला आहे. या प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यालयाने आपली अनेक वर्षांची १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा यावर्षीही पूर्ण ताकदीने अबाधित राखली आहे. या यशाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ निकाल १०० टक्के लागला नसून, विद्यार्थ्यांनी गुणांचा दर्जाही उत्तम राखला आहे. प्रशालेची विद्यार्थिनी अस्मा इमरान निवेकर हिने ८५.२०% गुण प्राप्त करून प्रशालेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. तिला सुहेल नौशाद मुल्ला याने ७४% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवून चांगली साथ दिली, तर सायमा बद्रुद्दिन खान हिने ७१.४०% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
या यशस्वी विद्यार्थ्यांसोबतच आयुश सुर्वे, फातिमा टेमकर, सबा तवसालकर, मसीरा सय्यद, आदी बंगाली, सकलेन मालगुंडकर आणि नजीब शेख या विद्यार्थ्यांनीही परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे केवळ शाळेचेच नव्हे, तर संपूर्ण सैतवडे पंचक्रोशीचे नाव अभिमानाने उंचावले आहे. ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देऊन विद्यार्थी यशाची शिखरे पादाक्रांत करत असल्याबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. शाळेचा निकाल संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही स्तरावर उत्कृष्ट लागल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. या यशाबद्दल बोलताना शाळेचे मुख्याध्यापक इमरान अंतुले यांनी सांगितले की, "शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य या त्रिसूत्रीमुळेच आम्ही ही १०० टक्के निकालाची परंपरा टिकवून ठेवू शकलो आहोत."
या सुयशबद्दल न्यू ईरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे. सर्व स्तरांतून या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.