loader
Breaking News
Breaking News
Foto

वादळी पावसाने लांजा तालुक्याला झोडपले

लांजा (संजय साळवी) - शुक्रवारी ८ मे रोजी सायंकाळी ६.३० वागण्याचा सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट करत कोसळलेल्या मुसळधार पावसाने लांजा शहरासह तालुक्यातील काही गावांना झोडपून काढले. या पावसामुळे वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. दरम्यान, पावसाच्या या जोरदार आगमनामुळे आंबा व काजू बागायतदार शेतकरी धास्तावून गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ झाले होते. उष्म्यात देखील प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे सकाळपासूनच पावसाची अटकळ बांधली जात होती. लांजा शहर वगळता तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये गुरुवारी ७ मे रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. शुक्रवारी ८ मे रोजी देखील सकाळपासून वातावरण ढगाळ झाले होते. त्यामुळे दिवसभर उष्म्यात प्रचंड वाढ झाली होती. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात पावसाचे ढग भरून आले आणि त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट करत पावसाने लांजा शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये दमदार हजेरी लावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या मुंबईकर चाकरमान्यांची आणि गावकऱ्यांची मुंबई तसेच गावाला ये-जा सुरू आहे. अशा परिस्थितीत कोसळलेल्या पावसामुळे लोकांची एकच धावपळ उडाली. सुमारे पाऊण तासभर हा पाऊस कोसळत होता. पावसामुळे लांजा शहर परिसरातील वीजपुरवठा देखील पूर्णपणे खंडित झाला होता. दरम्यान, आधीच संकटात सापडलेला कोकणातील आंबा व काजू बागायतदार या पावसामुळे आणखीन संकटात सापडला आहे. काजू हंगाम संपत आला असला तरी आंबा हंगाम अजून सुरू असल्याने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने आंबा बागायतदार चिंताग्रस्त बनला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg