loader
Breaking News
Breaking News
Foto

बालजगतमध्ये चमकणार शीळ शाळेचे विद्यार्थी, आकाशवाणीवर 10 मे रोजी प्रसारण

वेळणेश्वर - जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणारे दर्जेदार शिक्षण तर मिळतेच त्याचबरोबर इथल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्तम गुणवत्ताही असते. जिल्हा परिषदेच्या शीळ शाळेचे असेच गुणवान विद्यार्थी आकाशवाणीच्या बाल जगत कार्यक्रमात चमकणार आहेत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर दर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बाल जगत प्रसारित होतो. दहा मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या शीळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमात जिल्हा परिषद शीळ शाळेतील निधी शिळकर, युग वाडकर, देवांग पवार, मिस्त्री सनगरे, त्रिष्णा वाडकर, प्रांजल ओरपे, दूर्वा चापडे, तनिष्का बसरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच, इंधन बचत, जिल्हा परिषदेच्या शाळांची वैशिष्ट्य या शाळेची गुणवत्ता सांगणारा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा शीळचे मुख्याध्यापक मकसूद सय्यद सर आणि उपशिक्षिका वृषाली विभाकरनाचणकर यांनी मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमाचे निवेदन सोनाली सावंत यांनी केले असून कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे हे आहेत. सर्व रसिक श्रोत्यांनी हा कार्यक्रम अवश्य ऐकावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg