loader
Breaking News
Breaking News
Foto

पुष्पदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल रत्नागिरीच्या दहावीच्या पहिल्या बॅचचे उज्ज्वल यश

रत्नागिरी - पुष्पदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल, गयाळवाडी-खेडशी, रत्नागिरी येथील दहावीच्या पहिल्याच बॅचने घवघवीत यश संपादन करून शाळेचा गौरव वाढविला आहे. विशेष म्हणजे शाळेचा १००% निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यशाची परंपरा निर्माण केली आहे. प्रथम क्रमांक नुपूर निलेश दफ्तारदार ९३.८०%, द्वितीय क्रमांक खुशबू रामावतार कुमावत ९१%, द्वितीय क्रमांक : तोहीद अब्दुलरज्जाक कोरबू ९१%, तृतीय क्रमांक : अंतरा नंदकुमार सावंत ८५.२०% शाळेच्या १०० टक्के निकालात विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमासोबत शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका ईशा गोताड, उपमुख्याध्यापिका रेखा जाधव तसेच मार्गदर्शक शिक्षक अन्वी सुर्वे, शमा पठाण, रामदास शिंदे व सर्व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संस्थेचे अध्यक्ष हेरंब साळवी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg