परीक्षा होईपर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन मित्रांपासून दूर राहा : अँड.दीपक पटवर्धन
मुलांनो, परीक्षा होईपर्यंत तुमचे नको ते मित्र जे जोडले आहेत. त्यांना दूर ठेवा .म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन मित्रांपासून दूर राहा ,या दोन मित्रांना किंवा त्यांच्या प्रलोभनांना बळी पडू नका व फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा ,असे आवाहन रत्नागिरीतील प्रसिद्ध कायदेतज्ञ तथा स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष अँड.दीपक पटवर्धन यांनी नेवरे धामणसे शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभात बोलताना केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आता फक्त अभ्यास सगळ्यात लक्ष द्या, इतर सर्व कामे बाजूला ठेवा. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, तुम्ही यशस्वी व्हावे असे तुमच्या पालकांना वाटते म्हणूनच आपल्या पालकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अभ्यासाला लागा. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी शुभचिंतन सोहळा संपन्न झाला. तसेच खाद्य महोत्सव उपक्रम ही घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती .शोभा आप्पा खोत यांनी केले यावेळी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून मुख्याध्यापिका श्रीमती खोत यांनी शाळेतून जाताना चांगले संस्कार घेऊन जावे आणि खुल्या आसमंतात भरारी घ्यावी असे संस्कार विचार मांडले.
Video Info
- Created by: टाइम्स स्पेशल
- Completed on: 2025-01-30 00:00:00
- Type:video
- रत्नागिरी टाइम्स