loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत 'घे भरारी फाउंडेशन'ची गरबा नाईट २०२५ उत्साहात

सावंतवाडी (प्रतिनिधी)- घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी यांच्या वतीने नुकतेच नवरात्र उत्सवानिमित्ताने आरपीडी येथील नवरंग हॉलमध्ये 'गरबा नाईट २०२५' चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या गरबा नाईटला बहुसंख्य महिलांनी उपस्थिती लावत उस्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांच्या या उत्साहामुळे घे भरारीच्या अध्यक्षा रेखा कुमटेकर, कार्याध्यक्षा मेघना राऊळ, सेक्रेटरी सलोनी वंजारी, खजिनदार स्वप्नाली कारेकर आणि उपाध्यक्षा संध्या पवार यांनी आनंद व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मनसोक्त गरबा नृत्याचा आनंद घेत महिलांनी फेर धरला आणि अनेक आकर्षक बक्षिसे पटकावली, ज्यामुळे महिला वर्गात खूप उत्सुकता आणि आनंद दिसून आला. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. घे भरारी फाउंडेशन सोबतच F-3 फिटनेस आणि दुर्गा सरनाईक ग्रुप अशा अनेक ग्रुप्सनी उत्तमोत्तम गरबा नृत्ये सादर केली. रील सम्राट माही आणि मलिक यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली; त्यांनी स्वतः महिलांसोबत गरबा नृत्यात सहभाग घेतला.

टाइम्स स्पेशल

लकी ड्रॉ कुपनमध्ये पेडणेकर ज्वेलर्स कडून नथ, शामसुंदर मडकईकर यांच्याकडून हार सेट आणि पनवेलकर ज्वेलर्स यांच्याकडून नेकलेस सेट अशा तीन क्रमांकाची बक्षिसे विजेत्या महिलांना देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार अण्णा देसाई (सामाजिक कार्यकर्ता), मंजिरी सचिन धोपेश्वरकर (संगीत क्षेत्र), डॉक्टर निर्मला सावंत (वैद्यकीय क्षेत्र) आणि श्रद्धा सावंत (शैक्षणिक क्षेत्र) यांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg