loader
Breaking News
Breaking News
Foto

गावतळे गावचा सुपुत्र आदित्य पवारची नेपाळ येथे होणाऱ्या इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनसाठी भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड

दापोली (वार्ताहर) : टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळणाऱ्या दापोली तालुक्यातील गावतळे गावचा सुपुत्र आदित्य मनोज पवार याची नेपाळ येथे होणाऱ्या इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनसाठी भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. १० ऑक्टोबर रोजी १४ जणांचा संघ निवडण्यात आला त्यावेळी आदित्य मनोज पवार याची मुख्य फलंदाज म्हणून निवड झाली. सुरुवातीला आदित्यने त्रिवेणी क्रिकेट स्पोर्ट गावतळे संघाकडून खेळण्यास सुरुवात केली. पुढे वडिलांच्या नोकरीमुळे दापोलीत राहावयास गेल्यावर क्रिकेट प्रशिक्षक राम जागडे यांच्या तो नजरेत पडला त्यांनी आदित्यला क्रिकेटचे धडे दिले. त्याचा खेळ पाहून दापोलीतील सिया स्पोर्ट्स संघाने त्याला फलंदाज म्हणून संघात जागा दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी येथे निवड चाचणीत आदित्यने ६ चेंडूत ३ षटकार मारल्याने त्याची रत्नागिरी जिल्हा संघात निवड करण्यात आली. पुढे सोलापूर येथील अकलूज येथे रत्नागिरी संघाकडून ४ सामने खेळला. रत्नागिरी संघाकडून चांगला खेळ केल्याने टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रातने त्याची महाराष्ट्र कॅम्पसाठी निवड केली तेथून चांगली कामगिरी झाल्याने मुंबई संघात त्याची निवड झाली. मुंबई संघाकडून उत्तर प्रदेशात त्याने ५ सामने खेळून आघाडीचा फलंदाज म्हणून चांगली फलंदाजी केली त्यामुळे संघ अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम फेरीत महाराष्ट्र संघ विजेता तर मुंबई संघ उपविजेता ठरला असला तरी आदित्यला ८ षटकांच्या एकूण ५ सामन्यात १११ धावा केल्याने त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून पारितोषिक मिळाले आहे.

टाइम्स स्पेशल

याच कामगिरीची दाखल घेत त्याची भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड करण्यात आल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तो चांगला गोलंदाजी करतो आणि क्षेत्ररक्षण म्हणून त्याची कामगिरी भरीव आहे. त्याला कबड्डी खेळण्याची खूप आवड असून तो तालुक्यातील मोठ्या कबड्डी स्पर्धेत तो खेळला आहे. आदित्य पवार हा ऐ जी हायस्कूल दापोली येथे ११ वी सायन्स शिक्षण घेत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg