loader
Breaking News
Breaking News
Foto

मासेमारी ठप्प, तब्बल ५०० कोटींचे नुकसान

रत्नागिरी (वार्ताहर) : कोकण किनारपट्टीजवळील अरबी समुद्रात सध्या वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला असून, गेले तीन दिवसांपासून कोकणातील मच्छीमारी पूर्णपणे थांबली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी नौका विविध बंदरांमध्ये आश्रयाला आल्या आहेत. मिरकरवाडा जेट्टीसह जयगड, देवगड, मालवण, गुहागर, दापोली, मुरुड, अलिबाग येथील बंदरांमध्ये शेकडो नौका नांगर टाकून उभ्या आहेत. मासेमारी ठप्प झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ५०० कोटींची आर्थिक उलाढाल थांबली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस समुद्रात अशीच वादळी परिस्थिती कायम राहील. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्याचा परिणाम म्हणून अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात करंट निर्माण झाला आहे, ज्यामुळे मच्छीमारी नौका समुद्रात जाण्यास असमर्थ आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg