loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग आरक्षणात कही खुशी कही गम

कणकवली (प्रतिनिधी)- कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे नागरिकांचा इतर मागास प्रवर्गसाठी आरक्षित झाल्यानंतर प्रभात रचनेच्या आरक्षणाकडे लक्ष लागून राहिले होते.अवघ्या पाऊण तासामध्ये आरक्षण प्रक्रिया संपली. आरक्षण प्रक्रियेत अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाले तर अनेकांना संधी प्राप्त झाली आहे. ज्या विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत अशा माजी नगरसेवकांना आता दुसऱ्या प्रभागातून उमेदवारासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. कणकवली नगरपंचायतीची प्रभाग आरक्षण प्रक्रिया कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर, कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. चिठ्ठयांच्या माध्यमातून ही आरक्षण सोडत काढण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सद्यस्थितीत लागू आलेले आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग १ : सर्वसाधारण.प्रभाग २ : सर्वसाधारण महिला.प्रभाग ३ : सर्वसाधारण.प्रभाग ४ : ना.मा.प्र. महिला. प्रभाग ५ : ना.मा.प्र. महिला.प्रभाग ६ : सर्वसाधारण महिला.प्रभाग ७ : ना.मा.प्र. महिला.प्रभाग ८ : अनुसूचित जाती.प्रभाग ९ : सर्वसाधारण महिला.प्रभाग १० : सर्वसाधारण महिला.प्रभाग ११ : अनुसूचित जाती महिला.प्रभाग १२ : सर्वसाधारण महिला.प्रभाग १३ : ना.मा.प्र.,प्रभाग १४ ना.मा.प्र., प्रभाग १५ : सर्वसाधारण.प्रभाग १६ : सर्वसाधारण.प्रभाग १७ : सर्वसाधारण.असे आरक्षण झाले आहे. आरक्षण प्रक्रियेसाठी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगरसेवक ॲड. विराज भोसले, अभिजीत मुसळे, विलास कोरगावकर, संतोष पुजारे आदींसह कणकवली नगरपंचायतीचे कर्मचारी, कणकवली शहरातील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, कणकवलीकर नागरिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg