खेड: प्रतिनिधी रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली यांच्या वतीने सन २०२५ साठीचा महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा घेरापालगड शाळेतील शिक्षक अनंत करजवकर यांना संघटनेचे कार्याध्यक्ष संजय खटके यांच्या हस्ते पुणे येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशिद, राष्ट्रीय उपाध्यक्ष भरत पाटील पर्यटन विभाग कोकण अध्यक्ष बाळासाहेब नकाते, कार्याध्यक्ष संजय खटके,राज्य प्रसिद्धी प्रमुख गोविंद राठोड यांच्यासह राज्यभरातील मान्यवर व पुरस्कार विजेते उपस्थित होते. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आत्मविश्वास देणे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी झटणे आणि ते शिकवत असलेल्या विविध विषयात आकर्षण निर्माण करणे याबद्दल त्यांचा हातखंडा आहे.श्री. करजवकर यांनी ग्रामीण भागातील गरीब व वंचित मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत. शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, मुलींच्या शिक्षणासाठी पालकांना प्रेरित करणे यासाठी त्यांनी ग्रामीण भागात मेहनत घेतली आहे. त्यांना गायन ,वादन व काव्य लेखन करणे असे छंद आहेत. त्यांची 35 वर्षे सेवा झाली आहे. त्यांना हा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.