loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाला बुद्धिबळ स्पर्धेत यश

दापोली (प्रतिनिधी) : दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कणकवली येथे पार पडलेल्या कोकण झोनल बुद्धिबळ स्पर्धेत बुद्धिबळ - मुले या विभागात आपले प्रभुत्व राखत तृतीय क्रमांक प्राप्त केला तर याच स्पर्धेत बुद्धिबळ - मुली या विभागात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक मिळवला. . या स्पर्धेत महाविद्यालयाचा विद्यार्थी विपुल विलास तांडेल याने कांस्यपदक मिळवत आपले वर्चस्व स्थापित केले. या व्यतिरिक्त महाविद्यालयाच्या संघामध्ये ऋतिक वाडकर,शुभम पालशेतकर,आयुष साखरकर, सुजल वागजे,अनिरुद्ध भागवत सहभागी झाले होते. याच स्पर्धेत महाविद्यालयाच्या बुद्धिबळ - मुली संघाने तिसरा क्रमांक मिळवला. शर्वरी समीर पानवलकर हिने रौप्य पदक मिळवत आपले वर्चस्व स्थापित केले . हिच्या व्यतिरिक्त महाविद्यालयाच्या संघामध्ये सानिया जैन, सोनाली पाडवी, सानिया पठाण , सफा ए.के. ह्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यापुढे ठाणे येथे होणाऱ्या आंतर महाविद्यालयीन आंतर विभागीय स्पर्धांसाठी महाविद्यालयाचे विपुल तांडेल आणि शर्वरी पानवलकर कोकण झोनचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाविद्यालयासाठी अतिशय अभिनास्पद असलेल्या या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, क्रीडा संचालक प्रा. निधी भडवळकर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि पूर्ण संघाचे अभिनंदन केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg