loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर-देवरुख मार्गावरील तीन दुकानांत मध्यरात्री चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद, तपास सुरू

संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर-देवरुख मुख्य मार्गावरील बस स्थानक नाक्याजवळ तीन दुकानांत मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. मोबाईल विक्रीचे दुकान, कोल्ड्रिंक्स विक्रीचे दुकान आणि आणखी एका दुकानाला चोरट्याने लक्ष्य केले. विशेष म्हणजे, चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात स्पष्टपणे कैद झाला आहे. चोरीची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिस आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्राथमिक माहितीनुसार, चोरीमध्ये मोबाईल फोन, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. या घटनेमुळे व्यापार्‍यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, सतत वाढणार्‍या चोर्‍यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यांनी पोलिसांनी अधिक गस्त वाढवावी आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती नुसार चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास दुकाने फोडली, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्टपणे दिसत आहे. फॉरेन्सिक आणि श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू आहे. मात्र अद्याप कोणतीही अटक झालेली नाही. स्थानिक व्यापार्‍यांनी चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तत्काळ उपाययोजना कराव्यात आणि आरोपीला लवकर पकडून शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg