दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते विजघर मार्गावर गुरुवारी पहाटे तीन चार च्या सुमारास आवाडा येळपर्ई पुलाच्या ठिकाणी मालवाहतूक करणारा गोवा पासिंग आयशर टेम्पो चालकाला झोप आल्याने विरूद्ध दिशेला जाऊन झाडीत अडकून राहिला. हा अपघात घडल्यावर टेम्पो मधिल माल लगेच गायब झाला. तर घटनास्थळी चालक किंवा इतर कुणी नव्हते. त्यामुळे या टेम्पो मध्ये नेमके काय भरले होते याची चर्चा लोकात सुरू आहे. दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर , विजघर, हा गोवा राज्यात जाण्याचा जवळचा मार्ग तसा अवैध वाहतूक करण्यासाठी ओळखला जात आहे. या मार्गावर दारू, गोमांस, गुरे, तसेच लाकुड, चोरटी, वाहतूक यांनी चांगला चर्चेत आहे.
गुरूवारी पहाटे साडेतीन, चार दरम्यान, जी. ए. 04-टी.४७०८ हा आयशर मालवाहतूक टेम्पो आवाडा येळपर्ई पुलाजवळ अपघात झालेल्या स्थितीत आढळून आला विरुद्ध दिशेने टेम्पो रस्ता कडेला झाडा झुडपात गेला. यावरून प्रथमदर्शनी चालकाला झोप आल्याने तो खाली अपघात ग्रस्त झाला असावा येथील पोलीस पाटील देसाई याना सकाळी राञी अपघात झाला हे समजले त्यांनी पाहणी केली. अपघात ग्रस्त आयशर मालवाहतूक मध्ये नेमके काय भरले होते हे समजू शकले नाही. अपघात झाला हे लक्षात आले तेव्हा आतील साहित्य लगेच इतर वाहनातून तातडीने हलविले उजेड होईपर्यंत थांबले नाही. किंवा या ठिकाणी टेम्पो चालक इतर कोणी आढळून आले नाही. त्यामुळे टेम्पोमध्ये नेमके काय होते याची चर्चा परिसरात सुरू होती.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.