loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा क्रांती स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी प्रकाश चव्हाण : विजयराव कदम

मुंबई (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांच्या सुचनेनुसार ज्येष्ठ समाजनेते प्रकाश गणपतराव चव्हाण यांच्या निवडीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम यांनी जाहीर केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना राष्ट्रीय सल्लागार निवृत्त सहायक पोलीस आयुक्त अरविंद महापदी यांनी सांगितले, प्रकाश चव्हाण हे मंत्रालयात गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरन कोकण मंडळ या शासकीय मंडळात ३८ वर्ष सेवा करून निवृत्त झाले आहेत. शासन सेवेत असताना समाजात अनेक सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनेक समाज बांधव यांना सेवेतून सहकार्य व लाभ मिळवुन मदत केली. त्यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्ष उद्योजक गजाननराव साळुंखे, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे महाराज गायकवाड यांचे वकील ॲड. दिनेश शिंदे, हरियाणा अध्यक्ष राम नारायण मराठा, राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा. सौ. संध्याताई राणे, हिमाचल प्रदेश अध्यक्ष उद्योजक चंद्रकांत वाघ, अभिजित दरेकर, गुजरात राज्य अध्यक्ष राजुभाई शेवाळे, गुजरात राज्य सरचिटणीस पांडुरंग मोरे, गुजरात युवा अध्यक्ष प्रतापराव मोहिते,बडोदे जिल्हा अध्यक्ष करण पवार, मुंबई प्रदेश समन्वयक गणेश चौधरी, गुजरात राज्य महिला अध्यक्षा सौ.कल्पना सुर्वे, मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक डॉ.चंद्रकांत तुळशीराम मोजाड, नगर जिल्हा अध्यक्ष दीपकराव धट पाटील, नाशिक शहर महिला अध्यक्षा सौ. लता भिसे, कोकण प्रदेश अध्यक्ष महेंद्र भोसले, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे, जिल्हा प्रवक्ते राजेंद्र शेलार यांच्या सह शेकडो समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg