loader
Breaking News
Breaking News
Foto

सर्पमित्र गुरुनाथ बाचरे आणि मोरेश्वर बाचरे यांच्यामुळे नागाला मिळाले जीवदान

रत्नागिरी - रत्नागिरी तालुक्यातील मजगांव येथे एका विहिरीत पडलेल्या नाग जातीच्या सापाला केळ्ये येथील सर्पमित्र गुरुनाथ बाचरे आणि मोरेश्वर बाचरे यांच्यामुळे जीवदान मिळाले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की मजगांव येथील बाग स्टॉप येथे रहाणार्‍या हसीना इब्जी यांच्या स्वतःच्या मालकीच्या विहीरीत साप असल्याचे दिसले. सदरचा साप विहीरीत चार दिवस पाण्यावर तरंगत होता. त्या महिलेने अनेक ग्रामस्थांना साप बाहेर काढण्यासाठी विनंती केली. मात्र त्याला बाहेर काढण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. अखेर सदर महिलेने गांवाचे सरपंच फैयाज मुकादम आणि समाजसेवक मकबूल मुकादम यांना फोन करून सांगितले. सरपंच फैयाज मुकादम आणि मकबूल मुकादम यांनी तातडीने जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सरपंचांनी केळ्ये येथील सर्पमित्र गुरुनाथ बाचरे यांना फोन करून माहिती सांगितली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरुनाथ बाचरे, मोरेश्वर बाचरे तसेच वैभव धुलप तातडीने विहीरीजवळ आले. डबल दोरीच्या सहाय्याने नागोबा विहीरी बाहेर आले. बाचरे बंधूंनी नागोबाला शिताफिने बरणीमध्ये भरले आणि जंगलात सोडून दिले. बाचरे बांधवांमुळे एका नागाला जीवनदान मिळाले आणि नाग आपल्या मार्गी गेल्यामुळे हसीना इब्जी यांची ही भिती दूर झाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg