loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा-राजापूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या मृत

रत्नागिरी : मौजे-ओणी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील लांजा ते राजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ या रस्त्यावर बिबट्या हा वन्यप्राणी मृत अवस्थेत पडलेला असल्याची माहिती सकाळी ३:४० वाजण्याच्या सुमारास अमित यादव पोलिस निरीक्षक राजापूर यांनी दूरध्वनी वरून दिली. त्याप्रमाणे तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना सदरची माहिती देऊन सर्व स्टाफसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तर लांजा ते राजापूर जाणार्‍या महामार्गाच्या उजव्या बाजूला वन्यप्राणी बिबट्या (नर) निपचित पडलेला दिसून आला. जवळ जाऊन बिबट्याची पाहणी केली असता अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या तोंडाला व डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज नोंदविण्यात आला. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी राजापूर वैभव चोपडे यांच्याकडून बिबट्याचे शवविच्छेदन करून घेतले. सदर बिबट्या हा नर जातीचा असून अंदाजे ३ ते ४ वर्षांचा आहे. सदर घटनेचा गुन्हा नोंद केला असून कागदपत्र तयार करून पुढील तपास चालू केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कार्यवाही प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, जयराम बावधने वनपाल राजापूर, विक्रम कुंभार वनरक्षक राजापूर यांनी पूर्ण केली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी गिरिजा देसाई यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg