loader
Breaking News
Breaking News
Foto

ओझरवाडीतील कार्यकर्त्यांचा शिवसेना (उबाठा) पक्षात जाहीर प्रवेश

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते व आमदार भास्करराव जाधव यांच्या प्रेरणेतून तसेच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाप्रमुख बळीराम गुजर व शहरप्रमुख सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण शहरातील ओझरवाडी भागातील युवा व सुशिक्षित कार्यकर्ते गणेश यशवंत फके यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यावेळी आमदार भास्करराव जाधव यांनी फके यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उत्तर रत्नागिरी नूतन जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन (भैया) कदम, उपशहरप्रमुख मिथिलेश (विकी) नरळकर, राजन खेडेकर, शहर सचिव प्रशांत मुळये, विभागप्रमुख संजय भुवड, तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे, शाखाप्रमुख राजू गायकवाड, माजी सभापती व महिला आघाडी उपजिल्हा संघटिका धनश्रीताई शिंदे, ऐश्वर्याताई घोसाळकर, महिला शहर प्रमुख वैशालीताई शिंदे, महिला उपशहर प्रमुख सायलीताई कदम, शहर समन्वयक श्रद्धाताई घाडगे, विभाग संघटक नंदिनी जड्याळ, उपविभाग संघटक पल्लवी चव्हाण, शाखाप्रमुख वृषाली पाटणकर, युवतीसेना उपतालुका रेश्मा चव्हाण, उद्योजिका सोनाली चव्हाण तसेच युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, शिवसैनिक अजय भालेकर, सुधीर जाधव, रवींद्र खेतले आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg