loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपद 'अनुसूचित जाती महिलां'साठी आरक्षित

​सावंतवाडी (प्रतिनिधी):- ​सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले असून, यावेळचे सभापतीपद महिलांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. यामुळे सावंतवाडी पंचायत समितीवर पुन्हा एकदा 'महिलाराज' पाहायला मिळणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ही आरक्षण सोडत काढण्यात आली. मागील कार्यकाळातही सभापतीपद महिलांकडेच होते, त्यावेळी वृंध्दा सारंग , मानसी धुरी, निकिता सावंत, प्रियांका गावडे यांनी सभापती म्हणून यशस्वीपणे काम पाहिले होते. आता अनुसूचित जाती महिलेसाठी जागा राखीव झाल्याने, या प्रवर्गातून कोणत्या महिलेला २४ व्या सभापतीपदाची संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या इतिहासात ९ व्यांदा महिलेला सभापती होण्याची संधी मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आता सभापतीपदाच्या उमेदवाराची निश्चिती येत्या १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सदस्य आरक्षण सोडतीवर अवलंबून आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी कोणत्या पंचायत समिती मतदारसंघात आरक्षण मिळेल, यावर सभापती उमेदवार निश्चित होणार आहे. ​दरम्यान, तळवडे आणि ओटवणे पंचायत समिती मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदार जास्त असल्याने, यापैकी एका ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण राखीव पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ​आरक्षण जाहीर होताच महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख राजकीय गटांकडून योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. सभापतीपदासाठी योग्य 'अनुसूचित जाती महिला' उमेदवाराला संधी देण्यासाठी दोन्ही गट तयारीला लागले आहेत. ​दुसरीकडे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय धोरणे निश्चित करण्याची लगबग सुरू आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची चर्चा करत आहेत. तर, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) याबाबत आघाडी करण्यासंदर्भात लवकरच आपले धोरण जाहीर करणार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्रितपणे लढल्यास, काँग्रेसची भूमिका काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg