पनवेल (प्रतिनिधी) -लोकनेते दि.बा.पाटलांनी दिलेला वासरा आपल्याला पुढे चालवायचा आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिवाजीनगर येथे विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले. दानशूर व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नागरीकांना भेडसवण्यासा समस्या मार्गी लावावल्यात यासाठी नेहमीच पुढाकार घेत अनेक विकासाची कामे केली आहेत. त्यानुसार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या स्वनिधीतुन पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर गावातील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, अंतर्गत आर.सी.सी. गटार आणि नविन पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे. या सर्व कामांचे उद्घाटन आणि शिवाजीनगर गावाची बांधण्यात येणार्या कमानीचे भुमीपूजन भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. ०६) झाले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, लोकनेते दि. बा. पाटील आणि स्वर्गीय जनार्दन भगत यांनी दिलेल्या संस्कारातून आम्ही घडलो आणि मोठे झालो.
त्यांनीच आम्हाला चांगले कार्य करण्याच्या सवयी लावल्या असल्याचे सांगून त्यांनी जे आंदोलनाचे बीज रोवले ते आम्ही अजूनही चालु ठेवलं आहे असे प्रतिपादन केले. तसेच ज्या प्रकारची विकासाची कामे आत्ता पर्यंत झाली तशीच कामे येणार्या काळातही करत राहणार अशी ग्वाही दिली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, गव्हाण परिसरामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेते या भुमीकेतून अनेक विकास कामे केली. जिथे सरकारचा निधी उपलब्ध होऊ शकत नाही त्या ठिकाणी ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूरांनी पुढाकार घेऊन विभागाचा विकास केला. आपल्या परिसरामधील सर्व शाळा चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजेत त्याठिकाणी चांगले शिक्षण मिळाले पाहजे यासाठी आवश्यक ती ताकद लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लावली आहे. जे आपण करून ते चांगले आणि उत्तम झाले पाहिजे ही भावना त्यांनी ठेवली आहे. आणि हे करत असताना आपल्या गावचा विसर कधीही पडू दिला नाही त्यामुळे आपल्या परिसरामध्ये विकास कामे झाली पहिजे आपल्या परसिरातील समस्या मार्गी लागली पाहिजेत यासाठी सातत्याने ते दक्ष असतात, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व खूप मोठे असून आपण भाग्यवान आहोत की त्यांच्या सारखे नेतृत्व आपल्याला लाभले आहे, असे गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठनेते व माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊशेठ पाटील, शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, हेमंत ठाकूर, सचिन घरत, रतन भगत, विश्वनाथ कोळी, वसंतशेठ पाटील, जयवंत देशमुख, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, सागर ठाकूर, सी एल ठाकूर, सुधीर ठाकूर, मीनाक्षी पाटील, रमाकांत म्हात्रे, राजकिरण कोळी, नंदा ठाकूर, शशिकांत ठाकूर, सागर ठाकूर, कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, नरेश मोकळ, गव्हाण ग्रामपंचायत प्रशासक महेश घबाडी, विजय कुमार राठोड, गजानन ठाकूर, विजय ठाकूर, सुजित ठाकूर, किशोर ठाकूर, धनंजय ठाकूर, किशोर पाटील, शनिदास ठाकूर, श्रीराम ठाकूर, शशिकांत ठाकूर, चिंतामण ठाकूर यांच्यासह पंच कमिटी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.