loader
Breaking News
Breaking News
Foto

भीषण कार अपघातानंतर गौतमी पाटील गायब

मुंबई बंगलोर मार्गावर वडगाव पुलाजवळ हॉटेल बाहेर थांबलेल्या रिक्षाला गौतमी पाटील च्या कारने जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचालक मरगळे गंभीर जखमी झाले. रिक्षातील दोन प्रवासीही जखमी झाले. मरगळे यांना पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात उपचारसाठी नेले आहे. अपघातानंतर गौतमी व तिच्या टीमकडून आमची चौकशी तर सोडा मेसेज आला नाही, असे अपघातग्रस्त नागरिकांनी म्हटले आहे.प्रसिद्ध नृत्यांगना आज सातारा दौऱ्यावर होती

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे प्रकरण एका अपघाताशी निगडित आहे. 30 सप्टेंबर रोजी पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात एक अपघात झाला होता. हा अपघात एक कार आणि ऑटो रिक्षा यांच्यात झाला होता. या अपघातातील कार ही गौतमी पाटील हिची होती. गौतमीच्या कारने रिक्षाला मागून धडक दिली होती. या दुर्घटनेत रिक्षाचे चांगलेच नुकसान झाले होते. तसेच रिक्षाचलक जखमी झाला होता. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ रिक्षाचालकाला रुग्णालयात दाखल केले होते. या अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये बसलेली नव्हती, अशी प्राथमिक माहिती तेव्हा समोर आली होती.

टाइम्स स्पेशल

हा अपघात घडल्यानंतर गौतमी पाटीलच्या कारचा चालक घटनास्थळाहून फरार झाला होता. नंतर मात्र पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले होते. दरम्यान, आता गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी रिक्षा चालक कुटुंबियांची कारवाईची मागणी केली आहे. नृत्यांगणा गौतमी पाटीलला अटक करा, अशी मागणी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg