loader
Breaking News
Breaking News
Foto

चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र शासन वनविभागाच्या वतीने गौरव

दापोली- महाराष्ट्र शासन वन विभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दि. १ ऑक्टोबर ते दि. ७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी नुकत्याच शाळा स्तरावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. वन परिमंडळ दापोली तसेच सामाजिक वनीकरण दापोली विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. चित्रकला स्पर्धेत चंद्रनगर शाळेतील आरोही दीपक मिसाळ हिने प्रथम क्रमांक, अथर्व विकास पातेरे याने द्वितीय क्रमांक तर नीरव सचिन मोरे याने तृतीय क्रमांक पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चंद्रनगर शाळेत आयोजित केलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, वन विभागाचे दापोलीचे वनपाल रामदास खोत, सामाजिक वनीकरणचे वनरक्षक आत्माराम माने, कोंगळेचे वनरक्षक प्रभू साबणे, खेर्डीचे वनरक्षक विश्वंभर झाडे, बांधतिवरेचे वनरक्षक सुरज जगताप, ताडीलच्या वनरक्षक शुभांगी गुरव, चंद्रनगर ग्रा. पं. सदस्य गौरी मुलुख, ग्रामविकास अधिकारी संदीप सकपाळ, अनिल शिगवण आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू तसेच गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रामदास खोत, आत्माराम माने, प्रभू साबणे, चंद्रनगर सरपंच भाग्यश्री जगदाळे आदींनी विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण-काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबू घाडीगांवकर यांनी केले तर रेखा ढमके यांनी सर्वांचे आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg