loader
Breaking News
Breaking News
Foto

खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या कँटीनमध्ये अचानक स्फोट

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या कँटीनमध्ये शुक्रवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर कँटीनमध्ये भीषण आग लागली. शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. प्राथमिक माहितीनुसार, कँटीनच्या छपरावरून जाणार्‍या उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने ही घटना घडली. कँटीनच्या छपरावर प्लास्टिक व ताडपत्री घातल्याने ती तापली आणि विद्युत स्पर्श होताच स्फोट झाला. स्फोटानंतर काही क्षणातच छप्पर पेटले आणि आगीने संपूर्ण कँटीन जळून खाक झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र पालवे, तलाठी फिरोज खान, मुख्याध्यापक नंदु नाईक, सरपंच अपेक्षा नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, सामाजिक कार्यकर्ते साईश केसरकर आणि विज वितरण कंपनीचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बांदा ग्रामसाथाच्या सदस्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या आगीत कँटीनमधील फर्निचर, साहित्य आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून, पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. शाळा परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg