सावंतवाडी (प्रतिनिधी) : गोवा राज्यातील मोपा एअरपोर्टवर कार्यरत असलेल्या बी एफ एस इंडिया (BFS India) या ग्राऊंड हँडलिंग कंपनीतील कामगारांनी ऐतिहासिक पाऊल उचलत भारतीय कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. यामुळे मोपा एअरपोर्टवर आता भारतीय कामगार सेनेचा भगवा झेंडा डौलाने फडकताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा टप्पा पार पडला. बी एफ एस इंडिया कंपनीत काम करणाऱ्या सर्व कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम व सहचिटणीस सुजित कारेकर यांच्या नेतृत्वाखाली सदस्यत्व स्वीकारले.
सदस्यत्व स्वीकारल्यानंतर संजय कदम यांनी कामगारांची बैठक घेऊन त्यांना आश्वस्त केले. यानंतर त्यांनी कंपनीचे सीओओ पियुष खन्ना यांच्याशी थेट चर्चा केली. या बैठकीत कामगारांवर होणारा अन्याय, अपमानास्पद वागणूक, तसेच सवलती आणि पगारवाढी संदर्भातील गंभीर मुद्दे मांडण्यात आले. श्री. खन्ना यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी युनियन (भारतीय कामगार सेना) मान्य करत, जर मॅनेजमेंटकडून अशा हरकती होत असतील तर त्या ताबडतोब थांबवून कामगारांना विश्वासात घेऊन पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बाकीच्या मुद्द्यांवरही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. व्यवस्थापनाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि भारतीय कामगार सेनेच्या यशस्वी मध्यस्थीमुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय कामगार सेनेवरील विश्वास दृढ झाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली. याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस विजय तावडे, सुजित कारेकर, कार्यकारणी सदस्य सुदर्शन वारसे, तसेच बीएसएफची कमिटी मेंबर्स- जयकरा गवस, दिलेश राऊळ, मुयर कानसे, दीपेश गोवेरकर, जयराम सावंत, राजदीप धुरी, विकास कांबळे, तुषार पाटकर व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. सर्व कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे मनापासून आभार मानले. यामुळे मोपा एअरपोर्टवरील कामगारांच्या हक्कांसाठी आता एका बळकट संघटनेने पाऊल ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.