वेळणेश्वर (उमेश शिंदे) - शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण तालुका संघटनेने आज शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून निवेदन सादर केले. या निदर्शनाचे नेतृत्व शिवसेना चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांनी केले. राज्यातील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले असून, बळीराजावर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून योग्य आणि पुरेशी मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. म्हणून शिवसेनेने राज्य सरकारकडे पुढील मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली. १) अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५०,०००/- थेट आर्थिक मदत जाहीर करावी. २) नैसर्गिक आपत्तीपूर्व नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. ३) पिकविमा योजना सुलभ करून, विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. ४) अतिवृष्टीमुळे घरे आणि पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना पुरेसा मोबदला द्यावा. ५) जनतेसाठी बंद करण्यात आलेला ‘आनंदाचा शिधा’ तातडीने सुरू करावा. ६) राज्यातील महिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे ₹२१००/- ची आर्थिक मदत त्यांच्या खात्यात जमा करावी.
ही मागणीपत्रे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण तालुक्याच्या वतीने तहसीलदार प्रवीण लोकरे यांना देण्यात आली. त्यांनी या सर्व मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या व शासनाकडे पाठपुरावा करण्याचे १००% आश्वासन दिले. तसेच चिपळूण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल देखील शासनाकडे तातडीने पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, तहसीलदार प्रवीण लोकरे हे प्रशासकीय अधिकारी असूनही त्यांच्या वागण्यातून आणि संवादातून एक संवेदनशील प्रशासकीय दृष्टिकोनाचे दर्शन घडले. शेतकऱ्यांप्रतीची वेदना त्यांनी मनापासून ऐकून घेतली आणि समस्यांबाबत सहानुभूतीपूर्वक प्रतिसाद दिला. त्यामुळे उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली. या प्रसंगी चिपळूण तालुक्यातील तालुका समन्वयक सुधीर भाऊ शिंदे, तालुका संपर्क संघटक अशोकराव नलावडे, महिला माजी सभापती व उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे, ऐश्वर्या घोसाळकर, उपतालुका प्रमुख राजाभाऊ नारकर, सचिन शेट्ये, संदीप राणे, उपशहर प्रमुख राजन खेडेकर, विभागप्रमुख सागर सावंत, शशिकांत शिंदे, मनोज पांचाळ, उपविभाग प्रमुख मंगेश कोकीरकर, फैय्याज शिरळकर, तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे, युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, उपशहर प्रमुख आकाश कदम, ओंकार गायकवाड, विभाग प्रमुख अथर्व चव्हाण, शाखाप्रमुख राहुल गुरव, जियाद चिकटे व रोहन पवार या प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बळीराजाच्या न्यायासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी शिवसेना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचे या आंदोलनातून अधोरेखित केले.
शेतकऱ्यांचा प्रश्न हा फक्त कृषीचा नाही, तो महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आम्ही लढू, आणि बळीराजाला न्याय मिळवूनच राहू असा ठाम निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. या आंदोलनामुळे चिपळूणमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा जनआवाज घुमला, आणि शासनासमोर बळीराजाच्या न्यायासाठीचा मुद्दा ठामपणे उभा राहिला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.