loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी खा.विनायक राऊत यांचा लांजा तालुक्यातील नवरात्र मंडळ व ग्रामदैवत दर्शन दौरा

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर)- तालुक्यात सध्या नवरात्री उत्सवाची लगबग सुरू आहे. या नवरात्रोत्सवातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी लांजा तालुक्यातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ तसेच ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन तालुक्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झंझावात निर्माण केल्याने तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले. गावागावातील ग्रामस्थ व मानकरी यांच्यावतीने माजी खासदार विनायक राऊत व शिवसेना पदाधिकारी यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यातील अनेक नवरात्रोत्सव मंडळ व ग्रामदेवता यांचे दर्शन घेण्यासाठी आज शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी आज लांजा तालुक्याचा झंजावती दौरा केला व अनेक मंडळ व ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेचे गतवैभव प्राप्त होऊ दे असे साकडे घातले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार बाळ माने, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस, लांजा तालुका प्रमुख सुरेश करंबळे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख उल्का विश्वासराव, खानवली विभाग उपविभागप्रमुख प्रदीप गार्डी, सहकार सेनेचे जिल्हासंघटक चंद्रकांत शिंदे यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg