रत्नागिरी - येथील श्रीराम मंदिराचे प्रांगणातील श्री देवी तुळजाभवानी देवस्थानात दसर्याचे दिवशी गुरु. दि. २ ऑक्टो. रोजी ‘राजेशाही दसरा’ सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी लोटली होती. या तुळजाभवानी देवस्थानात सालाबाद प्रमाणे यावर्षीही ‘राजेशाही दसरा’ सोहळा ‘राजेशाही’ थाटात साजरा करण्यात आला. यावेळी ११ दाम्पत्ये यजमान म्हणून विविध धार्मिक विधींना उपस्थित होती. रत्नागिरीच्या किल्ले रत्नदुर्गचे छ. शिवाजी महाराजांचे काळातील किल्लेदार स्व. मालुसरे यांचे थेट १३ वे वंशज यावेळी उपस्थित होते. तसेच कुंभारखणी येथील सुप्रतिष्ठित नागरिक श्री. राजाराम सुर्वे, रत्नागिरीतील क्षत्रिय मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. राकेश नलावडे, योगा संस्थेचे सन्माननीय गुरुवर्य, संगमेश्वर ग्राम पंचायतीच्या भूतपूर्व सरपंच सौ. लोध व त्यांचे पती अशी मान्यवर मंडळी यावेळी यजमान म्हणून धार्मिक कार्याला उपस्थित होती.
सर्वप्रथम प्रभू श्रीराम व तुळजाभवानी यांच्यासमोर नारळ ठेऊन सर्वांच्या कल्याणासाठी श्री. सुधाकरराव सावंत यांनी खणखणीत आवाजात गार्हाणे घातले. त्यानंतर कार्यक्रमाला प्रारंभ झाला. श्री. सुधाकरराव सावंत यांनी सर्वांचे स्वागत करुन अतिथींचा परिचय करुन दिला. नंतर देवस्थानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी सर्वांना शुभेच्छा देणारे मनोगत व्यक्त केले. हे होताच लगोलग कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सर्व ११ यजमान दाम्पत्यांच्या शुभहस्ते शस्त्र पूजन करण्यात आले, पाठोपाठ शमी पूजन संपन्न झाले. त्यानंतर सर्व यजमानांच्या सौभाग्यवतींनी अश्व पूजन केले. ते होताच सर्व यजमानांच्या हस्ते आपटा वृक्षाचे पूजन करण्यात आले. यावेळी ७ पुरोहितांची टीम सज्ज ठेवण्यात आली होती. त्यानंतर देवतांची आरती करण्यात आली. तसेच नवरात्रोत्सवात संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमांची पारितोषिके यावेळी देण्यात आली. यानंतर सर्व यजमानांच्या हस्ते सोने लुटणे कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी सर्व यजमान खांद्यावर तलवारी घेऊन तर काहीजण तलवारी उंचावून सोने लुटण्यासाठी गेले. यजमानांच्या हस्ते सोने लुटण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर सर्व उपस्थितांना मनसोक्त सोने लुटण्याची मुभा देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत भाविक श्रीराम मंदिरात येऊन सोने लुटून नेत होते. यानंतर सर्वांना गोड पायनापल शिर्याचा महाप्रसाद देण्यात आला.
हा ‘राजेशाही दसरा’ सोहळा देवस्थानचे बुजूर्ग मानकरी श्री. संदीप डोंगरे (कमांडर - इन - चीफ) यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. तसेच श्री. नित्यानंद दळवी, श्री. संजय वैशंपायन, श्री. राकेश चव्हाण, सौ. राधिका चव्हाण, श्री. अनिल नागवेकर, श्री. संतोष रेडीज, श्री. उपेंद्र सुर्वे, श्री. रमाकांत पांचाळ सर, श्री. दिपक राऊत, श्री. दिपक देसाई, श्री. विनायक चव्हाण, श्री. विजय देसाई, श्री. पी. डी. सावंत, श्री. आंबवकर, श्री. शिंदे आदी मान्यवरांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. तसेच यावेळी डॉ. दिलीप पाखरे, श्री. सुहास तथा राजू भाटलेकर, श्री. किशोर मोरे, श्री. बाबासाहेब चौगुले, श्री. ओंकार भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विनायक हातखंबकर सर यांनी अतिशय झोकदारपणे केले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.