loader
Breaking News
Breaking News
Foto

खेर्डी ग्रामविकास मंडळ मुंबई आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात

दापोली ( प्रतिनिधी ) - खेर्डी ग्राम विकास मंडळ मुंबईच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या विदयार्थी गुण गौरव समारंभाला विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहून आपला गुणगौरव स्विकारुन ग्राम विकास मंडळ खेर्डी मुंबई ला उस्फुर्त प्रतिसादाची दाद दिली. दापोली तालुक्यातील खेर्डी ग्राम विकास मंडळ मुंबईच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी गुण समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात येते त्या प्रमाणे यावेळीही खेर्डी ग्राम विकास मंडळ मुंबई च्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने खेर्डी ग्राम विकास मंडळ हा सामाजिक दृष्टीकोन समोर ठेवून उपक्रम राबवत असतो. खेर्डी जिल्हा परिषद शाळेत आयोजित केलेल्या या गुण गौरव समारंभाला मंडळाचे अध्यक्ष नारायण गायकर, खेर्डी ग्राम पंचायतीच्या सरपंच रिया पवार, उपसरपंच शरद तांबे, शालेय कमिटी अध्यक्ष शांताराम गायकर, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल जाधव , पोलीस पाटील अन्वी करबेले, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कदम, सानिका मांडवकर, चंद्रकला जाधव, खेर्डी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गांधी यांच्यासह शिक्षकवृंद इतर शिक्षक, ग्रामस्थ गुरुदास सवनस्कर रामचंद्र जाडे, मिलिंद जाधव, रमेश जाधव (माजी सैनिक), मनोहर करबेले, नरेश पवार, नरेश बैकर, सुर्यकांत करबेले, राजन तेरेकर, रोशन करबेले, निलेश गायकर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

या विदयार्थी गुणगौरव समारंभाचे आपल्या ओघवत्या शैलीत मंडळाचे सेक्रेटरी रविंद्र बैकर तसेच उपसेक्रेटरी तुकाराम खामकर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात य 10 वी, 12 वी व पदवीधर विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व वाचनीय पुस्तके देण्यात आली. तर आपण ज्या शाळेत आपण शिकून मोठे झालो त्याची जाण ठेवून कृतज्ञता म्हणून शाळेतील मुलांना बसण्याची खेर्डी ग्राम विकास मंडळ मुंबईकडून बैठक व्यवस्था देणगी दाखल देण्यात आली. इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना खेर्डी मधली बैकर वाडी च्या माजी विद्यार्थ्यांनी बक्षीसे दिली.यावेळी रामचंद्र भुवड, व राकेश बैकर, प्रतीक भुवड, संदीप भुवड मंडळाचे माजी जेष्ठ सदस्य गणपत खळे, मधुकर जाडे प्रकाश बैकर हे या कार्यक्रमाला प्रतिनिधी म्हणून आवर्जून उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg