loader
Breaking News
Breaking News
Foto

1981 साली रत्नागिरी येथे स्थापन झालेल्या संग्राम क्रिकेट क्लब चा स्नेहमेळावा कुर्ली येथे संपन्न

रत्नागिरी : 1981 साली रत्नागिरी येथे स्थापन झालेल्या संग्राम क्रिकेट क्लब चा स्नेहमेळावा आज कुर्ली येथे संपन्न झाला. सन 1981 ते 2010 पर्यंत रत्नागिरी टेनिस क्रिकेट जगतावर आपली अभिजात सत्ता गाजवणाऱ्या संग्राम संघातील अनेक खेळाडू आज साठी सत्तरीत आहेत. यातील अनेक खेळाडू आजकाल जिल्हा क्रिकेट असोसिएशन मध्ये कार्यरत आहेत तर काही प्रशिक्षण क्षेत्रात उतरून रत्नागिरी क्रिकेट ची सेवा करत आहेत. आजच्या स्नेहमेळाव्यात हजर असलेल्या खेळाडूंमध्ये रत्नागिरी क्रिकेट गाजवलेले हरीश लाडे, प्रदीप साळवी, उदय पटवर्धन, प्रकाश लखन, दिवा मयेकर, अतिक पाटणकर, विकास संसारे, राजेश सावंत, बापू मयेकर, दादा कीर्तने, श्रद्धा सावंत, नारायण चौगुले, विलास सावंत आदि प्रमुख खेळाडू उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg