loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय रुग्णालयात मिळणार्‍या खोकल्याचा औषध पुरवठा मध्यप्रदेशातील, जनतेच्या मनात संभ्रम

देवळे (प्रकाश चाळके) - मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधामुळे अनेक पालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित कंपनीवर व औषधावर बंदी घालण्यात आली तसेच औषध कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातही शासकीय रुग्णालयातून मिळणार्‍या खोकल्याचे औषध ही मध्यप्रदेश मधूनच आले असून त्याची ही चौकशी व तपासणी व्हावी अशी जिल्ह्याभरातील जनतेची मागणी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यात अनेक बालकांचा खोकल्याचे औषधे घेतल्यामुळे मृत्यू झाला. त्या खोकल्याच्या औषधात काही असणारी केमिकल ही धोकादायक असल्याने ही या बालकांचा मृत्यू ओढवल्याचे औषध तपासणी अंती आलेल्या अहवालात म्हटले जाते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा मध्यप्रदेश मधूनच आलेल्या खोकल्यांचे औषध शासकीय रुग्णालयात वापरली जात असून त्या औषधांबाबतही जनतेच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण झाला आहे. या संशयाचे निरसन शासकीय यंत्रणेमार्फत होणे गरजेचे आहे असे सामान्य जनतेचे मत आहे.

टाइम्स स्पेशल

सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी खोकल्याचा कहर झाला असून गणपती उत्सवापूर्वीच अनेक गावातून खोकल्याचे अनेक रुग्ण वीज पंचवीस दिवस खोकतच असल्याचे चित्र दिसत होते. हा खोकला अनेक दिवस त्रास देत राहतो. अनेक औषध केली तरी हा खोकला कमी होत नसल्याचे जनतेतून बोलले जात आहे. रात्री या खोकल्याला फार जोर असतो. घशात खवखव येत राहते त्यामुळे सतत खोकून खोकून जीव मेटाकुटीला येत असतो. त्यामुळे सामान्य जनता शासकीय रुग्णालयात ही उपचार घेत असते त्यावेळी त्यांना मध्यप्रदेश मधून आलेलीच खोकल्याचे औषधे दिली गेली आहेत. कारण शासकीय रुग्णालयातून मध्यप्रदेश मधूनच आलेल्या औषधांचा कोठा पुरवला जात असल्याने औषध दिली जातात. मात्र सध्या मीडियावर येत असलेल्या बातम्यांमुळे मध्य प्रदेश मधील औषध बाबत सामान्य जनतेच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण झाला असून या संशयाचे निरसन शासकीय यंत्रणेमार्फत होणे गरजेचे आहे. ते व्हावे अशी सामान्य जनतेची मागणी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg