loader
Breaking News
Breaking News
Foto

आय.सी.एस. महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा

खेड - येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग व ग्रंथालय शास्त्र विभागाच्या वतीने 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात विविध कार्यक्रम घेण्यात आले. मराठी भाषेसंदर्भात विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत राहावे यासाठी एका प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना मराठी भाषा विषयक काही प्रश्न विचारले गेले. सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सांगता समारंभात अभिजात मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांना संबोधित करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. मराठी विभागाच्या प्रा.मेघना कांबळे यांनी प्रास्ताविकातून अभिजात मराठी भाषेविषयी माहिती दिली व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. महाविद्यालयाचे अधीक्षक डी. एम. शिंदे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्य डॉ. आर. एस. भालेराव यांनी मराठी भाषेचा अभिमान सर्वांनी बाळगला पाहिजे असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. ग्रंथपाल डॉ. राजेश राजम यांनी मराठी साहित्यातील संत, पंत, तंत साहित्याचे योगदान थोडक्यात सांगून सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg