loader
Breaking News
Breaking News
Foto

'बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळ'चा स्तुत्य उपक्रम: संविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची भेट!

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ​सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळाने यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने एक अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. मंडळाने उत्सवाच्या काळात जमवलेले अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू पणदूर येथील संविता आश्रमाला भेट म्हणून दिल्या. ​उत्सव काळात विविध उपक्रमांतून मंडळाने हे धान्य आणि साहित्य जमा केले होते. हे सर्व साहित्य गरजूंना मिळावे या उदात्त हेतूने मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी एकमताने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार, मंडळाच्या सदस्यांनी एकत्रितपणे संविता आश्रमात जाऊन हे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. ​केवळ मनोरंजन न करता, समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठीही उत्सवाचा उपयोग व्हावा, असा संदेश या कृतीतून बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळाने दिला आहे. मंडळाच्या या सामाजिक कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाने नवरात्र उत्सवाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला अधिक उंचीवर नेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg