loader
Breaking News
Breaking News
Foto

विभागस्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत जय गणेश इंग्लिश स्कुलचा संघ विजेता

मालवण (प्रतिनिधी) - डेरवण- रत्नागिरी येथे झालेल्या कोल्हापूर विभागस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षाखालील मुलांचा संघ अंतिम विजेता ठरला. अंतिम सामन्यात या संघाने इचलकरंजी संघावर मात करत कोल्हापूर विभागात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. त्यामुळे आगामी राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे नेतृत्व जय गणेश स्कूल, मालवणचा संघ करणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जय गणेश इंग्लिश स्कुलच्या संघातून लौकिक तळवडेकर, योगेश परुळेकर आणि आकाश साळगावकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजय संपादन केला. या विद्यार्थ्यांना विष्णू कोरगावकर, चंदू साळवी, विलास परुळेकर, पंकज राणे, निशिकांत पराडकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सदस्य, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg