देवरूख (सुरेश सप्रे) - देवरुखातील प्रसिध्द सोने व्यापारी धनंजय केतकर यांचे अपहरण व लुट प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने तपास करत चारच दिवसात आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करत पोलीस कस्टडी धाडण्याऱ्या पोलिसांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचेसह पोलीस दलाच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल साखरपा भागातील शिवसेनेचे जेष्ठ नेते बापू शेट्ये व याची झळ बसलेले सोने व्यापारी धनंजय केतकर यांनी पोलीस अधीक्षक यांची रत्नागिरी मुख्यालयात भेट घेत अभिनंदन केले सोने व्यापारी धनंजय केतकर यांचे अपहरण करून अंगावरील दागिने लुटून खंडणीची मागणी केल्यानंतर त्यांना मारहाण करून सोडून दील्या ने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
या अपहरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांनी देवरूख पोलीस व गुन्हा अन्वेषण विभागाला मार्गदर्शन करत पोलीसांची विविध पथके स्थापन करून जलदगतीने तपास सुरू केला होता. या अपहरण प्रकरणाचा अवघ्या चारच दिवसात छ्डा लावत प्रथम चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यात चारपैकी दोन आरोपी हे साखरपा-भडकंबा भागातील स्थानिक असल्याचे उघड झाले होते. या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करताना गुन्हा अन्वेषण विभागाच्या मदतीने देवरुख पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही दिवसांतच या गुन्ह्याचा मोठा पर्दाफाश केला.आतापर्यंत सात आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले आहे.
दोन स्थानिक तरुणांनी मुंबईजवळील बदलापूर येथील तरुणांना हाताशी धरून व्यापारी केतकर यांचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. यातील ५ आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.आत्तापर्यंत पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गतीने तपास करत या प्रकरणाची उकल करत तालुक्यातील जनतेला जो विश्वास दिला त्याबद्दल पोलीस अधीक्षक यांचे भेट घेऊन अभिनंदन करण्यात आले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.