loader
Breaking News
Breaking News
Foto

शाहनवाज उकये यांना “युवा रत्न” पुरस्काराने सन्मानित

म्हसळा - एकता सामाजिक विकास ट्रस्ट आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा परिसरात अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे समाजातील सर्व घटकांपर्यंत सेवा आणि शिक्षणाचा संदेश पोहोचविण्यात आला. दिव्यांगांसाठी विशेष तपासणी व प्रमाणपत्र शिबिर, विविध दाखल्यांसाठी कॅम्प, तसेच विद्यार्थ्यांना पेन आणि सामान्य ज्ञान पुस्तकांचे वाटप अशा अनेक उपक्रमांद्वारे शिक्षणाची गोडी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त आय.डी.एल. इंग्लिश हायस्कूल आणि वाचनालय उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. अल अहसान स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भेटीचे आयोजन, नाईक महाविद्यालयात शैक्षणिक व व्यवसाय कर्ज शिबीर घेऊन युवकांना प्रोत्साहन देण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेजने एनएसएस शिबिराद्वारे आदिवासी भागात सेवा कार्य करत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण निर्माण केले. तसेच नागरी संरक्षण प्रशिक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

या सर्व उपक्रमांमधून म्हसळा परिसरात सामाजिक जबाबदारी, शैक्षणिक प्रगती आणि मानवतावादी दृष्टिकोन यांचे उत्तम दर्शन घडले. याच कार्याची दखल घेत विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे शाहनवाज शाहिद उकये यांना आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात “आपदा मित्र” म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. त्यांना ‘युवा रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg