loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजणारीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

केळंबे - लांजा (सिराज नेवरेकर)- कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे ५,४५,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना आंजणारी शिखरे वाडीत घडली असुन लांजा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्या आला आहे. याबाबत लांजा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभांगी यशवंत शिखरे राहणार आंजणारी शिखरेवाडी यांचे कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने १२ मे ते २० सप्टेंबर या दरम्यान चोरीस गेले असून दिनांक १ ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्याविरुध्द लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२,५०,००० कीमतीचे मंगळसुत्र २५ ग्रॅम ६० मीली वजनाचे, १,५०,००० रुपये किंमतीचा १५ ग्रॅम ५२० मीली वजनाचा हार, ९०,००० रुपयांचा ६ ग्रॅम वजनाची कानातील कर्ण फुले व ३ ग्रॅम ८०मीली वजनाची कान साकळी, २५,००० रूपयांची २ ग्रॅम ५०० मीली ची लेडीज अंगठी, ३०,००० रुपयांची ३ ग्रॅम १०० मीली वजनाची जेंन्टस आंगठी एकूण ५,४५,००० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत. याबाबत लांजा पोलीस स्थानकात चोरट्याविरुध्द भारतीय संहिता २०२३चे कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कांबळे करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg