loader
Breaking News
Breaking News
Foto

रोणापालमध्ये स्नेहल गावडे ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत विजयी

बांदा (प्रतिनिधी) - श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल यांच्या वतीने आयोजित आणि मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे यांच्या पुरस्कृत ‘खेळ पैठणीचा श्रीमान-श्रीमती’ या भव्य कार्यक्रमात स्नेहल गावडे यांनी विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद सुहानी केणी यांच्या वाट्याला आले. तिसरा क्रमांक अनादी गावडे, चौथा ज्योती केणी, पाचवा राधिका परब आणि सहावा क्रमांक योगीता केणी यांनी मिळवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा रंगतदार कार्यक्रम श्री देवी माऊली मंदिराच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. कार्यक्रमात खेळांची धमाल आणि सहभागींच्या आनंदमय उपस्थितीने वातावरण रंगले होते. विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह आणि पैठणी असे आकर्षक बक्षिस देण्यात आले. स्पर्धकांनी आपल्या मनोगतातून असा उपक्रम दरवर्षी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या मध्यंतरात किशोरवयीन मुलांसाठी खास मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. जीवबा वीर यांनी बहारदार निवेदन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. माऊली सांस्कृतिक मंडळाने गावातील सामाजिक एकतेचा आणि सांस्कृतिक वारशाचा उत्कृष्ट आविष्कार या उपक्रमातून सादर केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg