मालवण (प्रतिनिधी) - मूळ सावंतवाडी तालुक्यातील रहिवासी आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक व ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. डॉ. प्रा.राम पणदूरकर यांनी मराठवाडा येथील अतिवृष्टीग्रस्त बळीराजांसाठी व उत्तर भारत मधील भूस्खलन ग्रस्तांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये रुपये १० लाखची देणगी नुकतीच पी.एम.ओ. साऊथ ब्लॉक दिल्ली, येथे धनादेशाद्वारे रवाना केली. यापूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी सिंदूर ऑपरेशनसाठी पणदूरकर यांच्या पत्नी हेमकिरण पणदूरकर यांनी रुपये पाच लाखची देणगी ’राष्ट्रीय संरक्षण निधी’साठी देताना देश परत आपत्तीत आला तर आम्ही अजूनही मदत करू, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पणदूरकर यांनी पूर्ण केले आहे.
पणदूरकर दाम्पत्याची एकमेव अपत्य, कन्या कै. ऍड. डॉ. रूपाली पणदूरकर हिच्या स्मृतीप्रत्यर्थ ही देणगी देण्यात आली आहे. या दाम्पत्याने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे ६५ लाख देणगीसह ’कै. डॉ. ड. रूपाली पणदूरकर अभ्यासिका’ निर्माण केली आहे. शिवाय सैनिकांसाठी पाच लाख देणगी दिली आहे. आता बळीराजासाठी दहा लाख रु. मदतरुपी देणगी दिली असून याशिवाय इतर सामाजिक संस्थांना देणगी आणि लहान मुलींच्या शिक्षणासाठी, सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी काही लाख रुपये देणगी दिली जाते. पणदूरकर दाम्पत्याच्या दातृत्वासाठी समाजातील लोक कृतज्ञ असून त्यांचा आदर्श घेऊन इतर लोकांनीही अशीच देणगी देशासाठी देऊन राष्ट्राचे हात बळकट करावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.