loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली येथे "स्वस्थ नारी, सशक्त परिवार"अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर

वरवेली (गणेश किर्वे) - स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राबविले जात असून या अभियानांतर्गत गुहागर तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे सरपंच नारायण आगरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. यामध्ये रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव, वाशिष्टी क्लिनिक हेल्थकेअर शृंगारतळीचे स्त्री रोग तज्ञ डॉ. मुग्धा नार्वेकर, आपला दवाखान्याचे डॉ.विनय माळकोटी, चिरंजीव बाल रुग्णालय चिपळूण येथील बालरोग तज्ञ डॉ. रूपाली राजेश कुष्टे, डॉ. अशोक कुंभार (वेलदुर), डॉ. रामेश्वर मोरे (कौंढर काळसूर), डॉ. अक्षय सानप (आरे) यांनी रुग्णांची तपासणी केली. सर्व रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आला.यावेळी उपसरपंच मृणाल विचारे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पवार, सेजल शिंदे, श्रावणी शिंदे, नरेश रांजाणे, अरुण रावणंग, तंटामुक्त समिती अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, गणेश किर्वे, सुप्रिया देसाई, समुदाय आरोग्य अधिकारी योगेश गायकवाड, वैभव पवार, आशिष विचारे, शशिकांत जाधव, दीपक किर्वे,अविनाश रांजाणे, पोलीस पाटील सुजित शिंदे ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड, आरोग्य सेविका पागडे, अंगणवाडी सेविका सीमा किर्वे, करुणा भोसले, श्वेता शिंदे, सानिका रांजाणे, आशा सेविका दिव्या किर्वे, अनुष्का शिंदे , पौर्णिमा गमरे यांच्यासह चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबीरामध्ये महिलांसाठी रक्तदाब (बीपी), मधुमेह आणि कर्करोग यासारख्या आजारांची व आरोग्याची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. महिलांचे अशक्तपणा, टीबी, रक्तक्षय आजारांची तपासणी,गर्भवती महिलांची नियमित तपासणी (गरोदर माता तपासणी) मुलांसाठी लसीकरण सुविधा. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व वय वंदना योजना ई-केवायसी करणे व आभा कार्ड काढणे या सेवांचा लाभ गावातील महिला व नागरी व मुलांनी घेतला. यावेळी सकस पोषण आहार खाद्यपदार्थांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते . अंगणवाडीतील विद्यार्थी व शाळेतील विद्यार्थी यांचीही यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. उपस्थित सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी व गावातील प्रमुख पदाधिकारी यांचे ग्रामपंचायतच्या वतीने वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे व आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य उप केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी योगेश गायकवाड यांनी आभार मानले. आरोग्य शिबिराच्या यशस्वीते साठी आरोग्य सेविका,आशा सेविका, अंगणवाडी सेविका व सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg