loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत गुणवंत विद्यार्थी गौरव व शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात

संगलट( खेड)(प्रतिनिधी) -महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन शाखा दापोली यांच्या वतीने “गुणवंत विद्यार्थी गुणगौरव आणि शाळा व शिक्षक सन्मान सोहळा – सन २०२५” हा भव्य कार्यक्रम रविवारी दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्री मंगल कार्यालय, दापोली येथे उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी नितीन अर्जुन बांद्रे, तालुका नेते – महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन शाखा दापोली हे होते. यावेळी विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत प्रवीण काटकर, रमाकांत शिगवण रामचंद्र सांगडे (गटशिक्षणाधिकारी, पं. स. दापोली), बळीराम राठोड, सुधाकर गायकवाड (शिक्षण विस्तार अधिकारी ), सुनिल कारखेले अध्यक्ष केंद्र प्रमुख संघटना, तसेच जिल्हाध्यक्ष विश्वनाथ डवरी, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास भोपे, जिल्हा महिला प्रतिनिधी विश्रांती शेळके फडतरे तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी आदि. मान्यवरांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी दापोली तालुक्यातील विविध शाळांमधील ४ थी vds 5 वी शिष्यवृत्तीधारक, नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थी, ८ वी शिष्यवृत्तीधारक, 8 वी RTS गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. तसेच मार्गदर्शक शिक्षक व शाळांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या हक्काबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून आधुनिक युगात आवश्यक असणाऱ्या AI तंत्रज्ञानाची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टाइम्स स्पेशल

या प्रसंगी शिक्षणातील गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास, तसेच जुन्या पेन्शन हक्कासाठी संघटनेची भूमिका याविषयी तालुकाध्यक्ष श्री.भालचंद्र घुले यांनी प्रास्ताविकेत आपले मनोगत व्यक्त केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सविता मडीवाळ व श्रीमती गीता पाध्ये यांनी केले.आभार प्रदर्शन सचिव श्री.स्वप्निल परकाळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या सर्व सदस्यांकडून करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवरांसह, संघटना पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg