loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गमध्ये मोटार सायकल चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कोसळली नदी पाञात, चालक किरकोळ जखमी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मार्गावर दोडामार्ग कलमठाणा येथे समोर अचानक आलेल्या मोटार सायकल चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात व्हॅगनेर कार थेट बारा फुट खोल नदी पाञात कोसळली पाणी असल्याने चालक राहुल गंवडळकर किरकोळ जखमी झाला. मात्र कारचे नुकसान झाले आहे. साटेली भेडशी येथील तरुण व्यापारी राहुल अरुण गंवडळकर हा रविवारी दुपारी दोडामार्ग येथून साटेली भेडशी आपल्या घरी जात असताना २.३० वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग कलमठाणा पुलावर एक मोटार सायकल चालक चक्क विरुद्ध दिशेने कार समोर आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार बारा फुट खोल नदी पाञात पाण्यात कोसळली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार नदी पाञात पडताच पाठीमागील डिकी उघडी झाली. इंजिनमध्ये, कारमध्ये पाणी शिरले. कार पाण्यात पडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली कार मधिल चालक राहुल अरुण गंवडळकर याला दोडामार्ग रूग्णालयात उपचारासाठी नेले. त्याला किरकोळ जखमा झाल्या, यावेळी तो कारमध्ये एकटाच होता. यामुळे मोठा अनर्थ टळला. दोडामार्गमध्ये अनेक दुचाकी वाहनधारक सुसाट तसेच चूकीच्या पध्दतीने वाहने चालवतात याचा फटका अशा प्रकारे कार चालकांना बसतो. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg