म्हसळा - १७ व्या पॅरा ऑलिम्पिक स्विमिंग स्पर्धेत म्हसळ्याचा सेलिब्रल पलसी ग्रस्त ऋषिकेश माळी चा तिसरा क्रमांक'.- नुकत्याच संभाजी नगर येथे पार पडलेल्या १७ व्या राज्य स्तरीय पॅरा ऑलिंपिक स्विमिंग कॉम्पिटीशन मध्ये सिनियर मेन्स ५० मीटर फ्री स्टाईल या प्रकारात (एस् ४ ) या गटात सेरेब्रल पाल्सी या असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या ऋषिकेश शितल सुदाम माळी या म्हसळा येथील मुलाने सहभाग घेऊन तिसरा क्रमांक मिळवून सेरेब्रल पाल्सी ग्रस्त पाल्य व पालक यांना एक नवीन मार्ग दाखवला आहे. सदर स्पर्धा भारतीय ऑलिंपिक संघटना याच्याशी संलग्न महाराष्ट्र राज्य पॅरालिम्पिक असोशिएशन आणि औरंगाबाद ( संभाजी नगर) डिस्ट्रिक्ट पॅरालिम्पिक असोसिएशन द्वारा आयोजित सिद्धार्थ जलतरण तलाव ( संभाजी नगर) येथे पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन संभाजी नगर चे पालक मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते झाले.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील जवळ पास २०० स्पर्धकांनी ज्यूनियर, सिनियर मेन वुमेन यांच्या विविध इव्हेंट मध्ये एस.१ ते एस. १४ या विविध गटातून विविध दिव्यांग प्रकारच्या दिव्यांग स्पर्धकांनी भाग घेतला. रायगड मधील म्हसळा सारख्या डोंगरी तालुक्यात राहणार्या ऋषिकेश ने आपल्या इच्छा शक्ती च्या जोरावर सेरेब्रलपाल्सी असताना देखील, म्हसळ्यात स्विमिंग च्या कोणत्याही सोई सुविधा नसताना देखील तसेच शरीराच्या वाढत्या स्पास्टीसीटी वर मात करत, स्विमिंगसाठी जसा वेळ मिळेल तसा सरावासाठी नाशिक येथील जिजामाता तरण तलाव गाठून सराव केला. ऋषिकेश च्या या प्रेरणादायी सहभागा बद्दल व तिसरा नंबर मिळवल्या बद्दल जिजामाता तरण तलाव च्या व्यवस्थापक सौ.माया जगताप, अर्जुन सोनकांबळे यांनी शुभेच्छा दिल्या. दिव्यांग मुले असली म्हणून खचून न जाता त्यांना विविध क्षेत्रातील दरवाजे आपण स्वकष्टाने उघडून देऊन त्यांच्या मध्ये जगण्याची, सहभाग घेण्याची व जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यात पालकांनी कुठे ही कसूर ठेवत कामा नये असे विचार ऋषिकेश ची आई शितल सुदाम माळी यांनी व्यक्त केले.
तसेच सेरेब्रल पाल्सी हा गट प्रकार एकत्र न करता सेरेब्रल पाल्सी या गटाच्या स्पर्धा वेगळ्या स्पर्धा आयोजित करून त्यांना जास्त वाव व प्रेरणा दिली पाहिजे ही अपेक्षा या वेळी ऋषिकेश ची आई शितल माळी यांनी व्यक्त केली. सदर राज्य स्तरीय पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ स्विमिंग पूल चे व्यवस्थापक अभय कुमार देशमुख, अर्चना जोशी, माधवी जोशी, मोरेश्वर पुजारी, आणि महाराष्ट्र पॅरालिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार नाळे व सर्व पदाधिकारी यांनी अपार मेहनत घेतली.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.