loader
Breaking News
Breaking News
Foto

जिंदाल विद्या मंदिर‌ रत्नागिरीमध्ये कु. यशवर्धन मोहिते याचा पावसाळी धावणे स्पर्धेत तिसरा क्रमांक

गुहागर (सचिन कुळये) - रत्नागिरी येथे पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत जिंदाल विद्या मंदिर प्रशालेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत मोठे यश संपादन केले आहे. तवसाळ गाव पंचक्रोशी मोहितेवाडी इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु. यशवर्धन विजय मोहीते याने रत्नागिरी जिंदाल विद्या मंदिर शाळेतील स्पर्धेत भाग घेत १७ वर्षाखालील गटात ८०० मीटर धावण्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवून आपले कौशल्य दाखवले. याचे सर्व श्रेय सौ. सुनिधी मोहिते यांना जाते. आपल्या मुलांचे शैक्षणिक व कला, क्रिडाप्रकारात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. स्वतः एक गृहिणी असताना सामाजिक संघटना, तवसाळ पडवे बचत गटाची संपूर्ण धूरा संभाळत असताना अनेक कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या परिसरातील महिला वर्ग यांना उत्तम माहिती देत बचत गटाचे महत्त्वाकांक्षी योजना कशा मिळतील याचे उत्तम काम करत आहेत. तर तवसाळ गाव पंचक्रोशीवतीने अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व यशस्वी खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. या विजयी खेळाडूंचे शाळेचे पर्यवेक्षक दिपक दरडी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय इंगवले आणि शिक्षकांनी अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg