loader
Breaking News
Breaking News
Foto

अविराज गावडे याने इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत केलेल्या जोरदार कामगिरीचे पा. ना. उदय सामंत यांचेकडून कौतुक

रत्नागिरी :- रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत केलेल्या जोरदार कामगिरीचे रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग व भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी कौतुक करताना अशा टॅलेंटेड युवा क्रिकेटपटूच्या सदैव पाठीशी आपण राहू असा विश्वास ना. सामंत यांनी दिला. इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत अविराज गावडेने जबरदस्त कामगिरी करताना शेवटच्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली होती. या स्पर्धेत त्याने सहावेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला. तसेच मिडलसेक्स कंट्री लीगचा बेस्ट बॉलर हा पुरस्कार सुद्धा मिळवला आहे. इंग्लंडमधील कौंटी स्पर्धा आटोपून मायदेशी परतलेल्या अविराज गावडे याचे रत्नागिरीत जोरदार स्वागत झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज अविराज गावडे याने रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी ना. सामंत यांनी अविराज गावडे याचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना अविराज गावडे या टॅलेंटेड युवा क्रिकेटपटूच्या पाठीशी आपण सदैव उभे राहू असे सांगितले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील क्रिकेटमध्ये अविराज गावडे याचा सहभाग होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, बाबू म्हाप आदी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg